Home हिंदी #Nagpur । नागपूरच्या डॉ. पूजा गायकवाड यांची “मिसेस इंडिया गॅलेक्सी नोबेल” मध्ये...

#Nagpur । नागपूरच्या डॉ. पूजा गायकवाड यांची “मिसेस इंडिया गॅलेक्सी नोबेल” मध्ये निवड

418

नागपूर ब्युरो : शहरातील मनिषनगर येथील गायकवाड कोचिंग क्लासेस धंतोलीच्या संचालिका डॉ.पूजा गायकवाड यांची नुकत्याच झालेल्या दिल्ली येथे आयोजन कार्यक्रमात मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021 च्या स्पर्धेत “मिसेस इंडिया गॅलेक्सी नोबेल” म्हणून निवड करण्यात आली.

भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या महिलांनी येथे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. डॉ.सौ.पूजा गायकवाड ह्या प्रामुख्याने एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. तसेच त्या एक निसर्गप्रेमी सुद्धा आहेत. त्या कोचिंगच्या क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून कार्यरत असून जीवशास्त्र या विषयात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेत. तसेच त्यांना समाजकार्याची आवड असून त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग शिकवितात.

आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना सदैव त्यांना समाजातील इतर तळागळातील लोकांपर्यंत घेऊन जाते. मिसेस इंडिया गॅलेक्सी, लग्न झालेल्या महिलांना त्यांचे टॅलेंट दाखविण्यासाठी व पुढे येऊन स्वता:साठी काही करण्याकरिता नेहमीच प्रोत्साहित करीत असते. दिल्ली येथे पार पडलेल्या “ग्रॅण्ड फिनाले इंव्हेट ” साठी मान्यवर जजेस उपस्थित होते. गायकवाड कोचिंग क्लासेसचे सुधाकर गायकवाड ह्यांची त्यांना स्पर्धेसाठी जोडीदार म्हणून फार मदत झाली. तसेच मिसेस इंडिया गॅलेक्सीचे संचालक गगनदीप कपूर व गिंन्नी कपूर यांचेही आभार मानले.

Previous articleआता लॉकडाऊन नाही । तातडीची बैठक : गर्दी थांबवणे हेच प्रमुख लक्ष्य- आरोग्यमंत्री टोपे
Next article@kvicindia | खादी की विश्वसनीयता और महत्व को पहचानें, खादी का उपयोग करें : आर. विमला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).