Home कोरोना 11,877 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत 7,792 जणांना बाधा; राज्यात 50 ओमायक्रॉनबाधित

11,877 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत 7,792 जणांना बाधा; राज्यात 50 ओमायक्रॉनबाधित

460

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली असून रविवारी एका दिवसात ११,८७७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यात मुंबईत सर्वाधिक ७,७९२, तर त्याखालोखाल ठाण्यात ६१७, कल्याणमध्ये २६०, तर पुण्यात १५६ नव्या रुग्णांचे निदान झाले. दरम्यान, कोराेनाबाधित रुग्णांची संख्या खान्देशात सर्वात कमी असून इतर विभागांत मुंबई-पुण्याच्या तुलनेत कमी रुग्ण आढळले आहेत. राज्यात रविवारी ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

रायगडमध्ये १२८, पनवेल -१९८, नाशिक -११७, अहमदनगर जिल्हा -९५, जळगाव -११, मालेगाव -६, औरंगाबाद -३५, जालना -८, लातूर -२७, नांदेड -८, अमरावती -१६, यवतमाळ -६, अकोला -२, बुलडाणा जिल्ह्यात ३ नवे कोरोनाबाधिक रुग्ण आढळले.

पुण्यात आढळले ३६ ओमायक्रॉनबाधित : रविवारी महाराष्ट्रात ५० ओमायक्रॉनबाधितांचे निदान झाले. यात ३६ एकट्या पुण्यातील आहे. पिंपरी-चिंचवड ८, पुणे ग्रामीण २, सांगली २, ठाणे १ आणि मुंबईत १ रुग्ण आढळला. आजवर राज्यात मुंबईत सर्वाधिक ३२८ ओमायक्रॉनबाधित आढळले असून पुण्यात ही संख्या ४९ आहे. राज्याच्या विविध भागांत एकूण ५१० रुग्ण आढळले असून यापैकी १९३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या इतर भागांत नवे रुग्ण आढळलेले नाहीत. दरम्यान, १ नोव्हेंबरपासून राज्यात बाहेर देशांतून आलेल्या प्रवाशांचे सर्व्हेक्षण सुरू असून २२८४ नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

देशात रविवारी ३२ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिल्लीत रविवारी कोरोनाचे ३,१९४ नवे रुग्ण आढळले. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १.४० लाख झाली. दिल्ली, महाराष्ट्र आिण प. बंगालमध्ये रुग्णांत मोठी वाढ होत आहे. दिल्लीत ३,१९४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्णही १,७१८ झाले आहेत.

Previous articleआजपासून 15-18 वयोगटाचे लसीकरण ; केंद्रांवर वेगळी व्यवस्था, शाळांतही असतील केंद्र
Next articleसावित्रीबाई फुले जयंती विशेष । क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी सामाजिक कुप्रथांविरोधात चळवळींचेही नेतृत्व केले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).