Home कोरोना मुलांना कोव्हॅक्सिनच; ज्येष्ठांसाठी दोन डोसमध्ये अंतर 9 ते 12 महिने

मुलांना कोव्हॅक्सिनच; ज्येष्ठांसाठी दोन डोसमध्ये अंतर 9 ते 12 महिने

442

केंद्र सरकारने १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ३ जानेवारीपासून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांसाठी देशात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ व झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ लस मंजूर झाली आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुलांना फक्त कोव्हॅक्सिनच दिली जाईल. म्हणजे झायकोव्ह-डी लस सध्या दिली जाणार नाही. दरम्यान, आजारी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये ९ ते १२ महिन्यांचे अंतर राहू शकते.

सध्या मुलांची फक्त एक कॅटेगरी बनवली जाईल. त्यांची संख्या ८ ते १० कोटी असू शकते. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी दरमहिन्याला कोव्हॅक्सिनचे ५ कोटी डोस मिळतात. कंपनी दरमहा ७ कोटी डोस तयार करत आहे. सध्याच्या क्षमतेनुसार, मुलांना रोज १७ लाख डोस दिले जाऊ शकतात. कंपनीने उत्पादन क्षमता ७ कोटी केल्यास रोज २३ लाख डोस शक्य आहेत. एका अधिकाऱ्यानुसार, कोव्हॅक्सिनचे २ कोटी डोस स्टॉकमध्ये आहेत. सध्या प्रौढांना तिचे १० ते १५ लाख डोस रोज दिले जात आहेत.

मुलांच्या डोससाठी नोंदणी १ किंवा २ जानेवारीपासून कोविन अॅपवर सुरू होईल. त्यांना ३ जानेवारीपासून डोस दिले जातील. अशाच प्रकारे ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून तिसरा डोस देणे सुरू होईल. त्यांची नोंदणी १० जानेवारीच्या २-३ दिवस आधी सुरू होईल.

केंद्र सरकारने झायडस कॅडिलाला झायकोव्ह-डीची १ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे, पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती मिळण्याची शक्यता नाही. सूत्रांनुसार, ही लस सध्या मुलांना दिली जाणार नाही. एनटागीने तिला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्टही केले नाही. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढून ५०२ झाले. रविवारी मध्य प्रदेशात ८, हिमाचलमध्ये १ रुग्ण आढळला.

रोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर म्हणजे प्रिकॉशन डोसमध्ये ९ ते १२ महिन्यांचे अंतर राहू शकते. सूत्रांनुसार, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या (बूस्टर) डोसमधील अंतर ठरवण्यावर एनटागी विचार करत आहे. हेच अंतर राहिले तर मार्च २०२१ मध्ये दुसरा डोस घेणारे ज्येष्ठ नागरिक जानेवारीत बूस्टर डोस घेऊ शकतील. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल. आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाईल. जे गंभीर आजारांनी पीडित आहेत अशा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून बूस्टर डोस दिला जाईल.

Previous articleसलमान को सांप ने काटा : पनवेल के फॉर्म हाउस में क्रिसमस मनाने गए थे
Next articleविधानसभा अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी; पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).