Home Covid-19 23 देशांमध्ये पोहोचला नवा व्हेरिएंट, 30 पेक्षा जास्त देशांनी ट्रॅव्हल बॅनपासून तर...

23 देशांमध्ये पोहोचला नवा व्हेरिएंट, 30 पेक्षा जास्त देशांनी ट्रॅव्हल बॅनपासून तर सीमाही केल्या बंद

289
0

ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार जगभरात झपाट्याने पसरत आहे. गेल्या एका आठवड्यात त्याने दक्षिण आफ्रिकेपासून 23 देशांमध्ये दार ठोठावले आहे. बाधित देशांव्यतिरिक्त, एकूण 30 हून अधिक देशांनी आतापर्यंत त्यांच्या सीमा सील केल्या आहेत, ज्यात प्रवास बंदी समाविष्ट आहे.

ओमायक्रॉन सध्या ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बोत्सवाना, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इटली, जपान, नेदरलँड, नायजेरिया, पोर्तुगाल, रीयुनियन, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि यूके पोहोचला आहे.

चीनमध्ये सीमेवर आधीच कडक निर्बंध लादण्यात आले होते. येथे केवळ नागरिकांना आणि परमिटधारकांनाच देशात प्रवेश करण्याची परवानगी आहे. याशिवाय हाँगकाँगने दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, इस्वाटिनी, लेसोथो, मलावी, मोझांबिक, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे.

हाँगकाँगने सोमवारी अंगोला, इथिओपिया, नायजेरिया आणि झांबियाचा देखील प्रतिबंधित देश म्हणून समावेश केला. यासोबतच जे लोक देशाचे नागरिक नाहीत आणि गेल्या 21 दिवसांत ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, जर्मनी, इस्रायल आणि इटलीला गेले होते, त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. बुधवारी या यादीत जपान, पोर्तुगाल आणि स्वीडनचा समावेश करण्यात आला आहे.

इस्रायलने परदेशातून येणाऱ्या लोकांना पुढील 14 दिवसांसाठी देशात येण्यास बंदी घातली आहे. इस्रायलचे जे नागरिक देशाबाहेर आहेत त्यांना परत आल्यावर 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाही हा नियम लागू होईल.

परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी जपानने आपल्या सीमा एका महिन्यासाठी बंद केल्या आहेत. त्यात परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे.मोरोक्कोने इतर देशांमधून येणारी सर्व उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहेत.

ओमायक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता, भारत सरकारने सोमवारी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार ‘हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना येताच कोविड-19 चाचणी करावी लागेल. येणाऱ्या प्रवाशांचे पूर्ण लसीकरण झाले असले तरीही चाचणीची अट लागू असेल.

‘हाय रिस्क’ देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. ज्या देशांना ओमायक्रॉनच्या धोक्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे, तिथून येणाऱ्या प्रवाशांपैकी 5% प्रवाशांची निश्चितपणे चाचणी केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here