Home Nagpur Maha Metro । एक्वा मार्गावर लोकमान्य नगर ते झाशी राणी स्टेशन पर्यंत...

Maha Metro । एक्वा मार्गावर लोकमान्य नगर ते झाशी राणी स्टेशन पर्यंत दहा दिवस बंद राहणार मेट्रो सेवा

590

नागपूर ब्युरो : महा मेट्रोच्या रिच-४ अंतर्गत असलेल्या सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान कमिशनिंग कार्य होऊ घातले आहे. यामुळे येथून १ ते १० डिसेंबर दरम्यान एक्वा मार्गिकेवर मेट्रो सेवा लोकमान्य नगर स्टेशन ते झाशी राणी चौक स्टेशन पर्यंत बंद राहणार आहे.

महा मेट्रो तर्फे झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान प्रवासाकरता निशुल्क फिडर बस सेवा प्रदान करण्यात आली आहे. झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास करत ऑरेंज मार्गिकेवर पुढील प्रवास करू इच्छिणारे प्रवासी फिडर बस सेवेच्या माध्यमाने सीताबर्डी इंटर चेंज स्टेशन पर्यंत प्रवास करू शकतात. तसेच ऑरेंज मार्गिकेवर प्रवास करणारे आणि एक्वा मार्गिकेवर पुढील प्रवास करू इच्छिणारे प्रवासी याच फिडर बसच्या माध्यमाने झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंत जाऊ शकतील, अशी माहिती महा मेट्रो तर्फे देण्यात आली आहे.

Previous article35 साल बाद पूर्व विद्यार्थियों की रीयूनियन, मिले तो फिर ताजा हुई पुरानी यादें
Next article#Maharashtra | दक्षिण अफ्रीका से मुंबई आया यात्री कोरोना पॉजिटिव
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).