Home Covid-19 #Maharashtra । कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत

#Maharashtra । कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत

457
जवळपास दोन वर्षांपासून कोरोना या जीवघेण्या आजाराचा सामना सर्वजण करत आहेत. संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. आता कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने शासन निर्णय जारी करत ही घोषणा केली आहे. कोरोनामुळे कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे कुटुंबासमोर उदर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा लोकांना राज्य सरकाने मोठा दिलासा दिला आहे.

राज्यात ज्या व्यक्तीचे कोव्हिड-19 मुळे निधन पावले आहे, त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यासा शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

कोणाला मिळणार मदत?

RT-PCR/Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-19 असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-19 मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड 19 प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड 19 चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे पकडण्यात येणार आहे.

कोव्हिड 19 चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येईल.

ज्या कोव्हिड 19 च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड 19 पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येईल.

Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड 19 मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील 2.1 ते 2.4 मधील अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु. 50,000 च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.
हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक आहे. अर्जदाराचा स्वतःचा तपशील. आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक आणि अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशीलाची नोंद करायची आहे.

Previous articleOmicron Variant | जानिए दक्षिण अफ्रीका में मिले नए वेरिएंट के बारे में अब तक क्या-क्या पता चला?
Next article30 दिवसांत 2400 विद्यार्थी पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातील सर्वाधिक 1700; विवाहसोहळ्यांना सामील होणारे बनले सुपर स्प्रेडर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).