Home Legal नवाब मलिकांना कोर्टाचा झटका, वानखेडे कुटुंबावर आता वक्तव्य, आरोप करण्यावर बंदी

नवाब मलिकांना कोर्टाचा झटका, वानखेडे कुटुंबावर आता वक्तव्य, आरोप करण्यावर बंदी

442

मुंबई ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मलिक मुंबई हायकोर्टाला दिली असल्याची माहिती आहे.

कोर्टाचे आदेश काय?

पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.

अब्रूनुकसानीचा खटला

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.

मलिक यांच्याकडून सकाळीच आरोप

सकाळीच नवाब मलिक यांनी “आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत काही कागदपत्रं शेअर करत काही आरोप केले होते. महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.

Previous article#Maharashtra । 232 दिवसांनी प्रकट झाले परमबीर, गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन नोंदवला जबाब
Next articleसिर्फ आर्थिक तौर पर कमजोर लोगों को ही मिलेगी LPG सब्सिडी, अगले बजट में सरकार कर सकती है ऐलान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).