Home Indian Navy @indiannavy | स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज होणार नौदलात दाखल

@indiannavy | स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज होणार नौदलात दाखल

452

ब्रह्मोस-बराकसारखी मिसाईल सोडणे देखील शक्य

देशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल होणार आहे. जहाजावरून ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणे आता शक्य आहे. यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थित नौदलात स्वदेशी स्टेल्थ मिसाईल डेस्ट्रोयर जहाज आयएनएस दाखल होणार आहे. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. सकाळी 10 वाजता मुंबई डॉकयार्डमध्ये राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल होणार आहे.

आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. 163 मीटर लांब आणि 7400 टन वजनाची ही नौका आहे. सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे त्यात आहेत.

भारतीय नौदलात सध्या 130 युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर249 ए स्टीलचा वापर करून तयार करण्यात आली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका असल्याचे बोलले जात आहे.

चार दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी स्कोर्पीन क्लासची चौथी पाणबुडी आयएनएस वेलाही भारताची समुद्रातील ताकद वाढवणार आहे. 25 तारखेला आयएनएस वेला नौदलात दाखल होणार आहे. या कार्यक्रमाला नौदलाचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे.

नौदलाच्या ताफ्यात वेलाच्या समावेशामुळे या प्रकल्पातील निम्मा टप्पा पूर्ण होणार आहे. या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव डॉक लिमिटेड(एमडीएल) येथे करण्यात येत आहे आणि फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या धर्तीवर त्या बांधण्यात येत आहेत. ही पाणबुडी वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पाणबुड्यांच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे.

Previous article#Nagpur । नागपुरात आज होत आहे पर्यावरणस्नेही शुभमंगल, पर्यावरण सप्तपदीची शपथ; पत्रिका कुंडीत टाकताच उगवेल रोप
Next article#Maharashtra । संप काही सुटेना, खान्देशात 5 बसेसवर दगडफेक, चालक जखमी; मुंबईत ‘फ्लॅश लाइट’ आंदोलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).