Home Maharashtra #Nagpur । नागपुरात आज होत आहे पर्यावरणस्नेही शुभमंगल, पर्यावरण सप्तपदीची शपथ; पत्रिका...

#Nagpur । नागपुरात आज होत आहे पर्यावरणस्नेही शुभमंगल, पर्यावरण सप्तपदीची शपथ; पत्रिका कुंडीत टाकताच उगवेल रोप

614

तुळशी विवाहानंतर लग्न धूमधडाक्यात सुरू झाले आहे. सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांनी पापण्यांवर नवी स्वप्ने पेरली जात आहेत. या सर्व लग्नांमध्ये प्लास्टिकचा मुक्त वापर असतो. पण, उद्या रविवार, २१ रोजी नागपुरात एक संपूर्ण पर्यावरणस्नेही लग्न लागत आहे. या लग्नाची पत्रिका नंतर कुंडीत टाकली की त्यातून एक रोप उगवेल…मध्य भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव लग्न असल्याचे सांगितले जाते. इको ब्रिक चळवळीसह नो प्लास्टिक चळवळीतील अग्रणी जुई मकरंद पांढरीपांडे व नहुष प्रवीण सहस्रबुद्धे. रविवारी १०.१५ वाजता विवाहबद्ध होत आहेत.

या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण विवाह सोहळा पर्यावरणस्नेही आहे. अशा प्रकारचा हा पर्यावरणस्नेही विवाह सोहळा मध्य भारतातील कदाचित पहिलाच असावा. या लग्नात अपसायकलिंग कन्सेप्टवर भर देण्यात आला आहे. आजवर रिसायकलिंग आपल्या परिचयाचे होते, जुईनं अपसायकलिंग केले आहे. पांढरीपांडे कुटुंबाने या पर्यावरणस्नेही लग्नाचा कोणताही कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही. कुटुंबातील घटक, मित्र परिवार आणि निकटस्थांनी मिळून हे सारे घडवून आणले आहे.

या लग्नाची पत्रिका गाईचे शेण आणि गोमूत्रापासून निर्मित कागदावर छापलेली आहे. या कागदात मोहरी, झेंडू, टोमॅटो, मिरचीसह अन्य भाजीपाला व फुलांच्या बिया असतात. जयपूरची गौकृती संस्था हा कागद तयार करते. तिथून मागवून पत्रिका छापल्याची माहिती वधू जुई मकरंद पांढरीपांडे हिने दिली. पत्रिका वाचल्यानंतर कुंडीत टाकायची व पाणी घालायचे. त्याच्या लगद्यातील बीमधून रोपे उगवतात…

लग्नात विहिणीसाठी गुलाबाच्या वा अन्य फुलांच्या पायघड्या घालतात. नंतर ही फुले अक्षरश: फेकली जातात. ते टाळण्यासाठी लोकरीच्या गोंड्यांची आसने तयार केली. ती कुंकवाचे पाय लागून खराब होऊ नये म्हणून जुन्या कापडांची आसने तयार केली. ही आसने ठेवणार आहे. रुखवतासाठी हरित घराची प्रतिकृती तयार केली आहे. या घरात वीज बचत, पाण्याची बचत, घनकचरा व्यवस्थापनासह एक घर पर्यावरणपूरक राहण्यासाठी आवश्यक गोष्टी ठेवण्यात येणार असल्याचे जुईने सांगितले.

विधी झाल्यावर तुळशी वृंदावनाचे पूजन करणार, सासरी घेऊन जाणार.
  • सप्तपदीचे लोकरीचे गोल, पारंपरिक सप्तपदीनंतर पर्यावरणाच्या सप्तपदीमध्ये सात संकल्प घेणार.
  • मेंदीचा पोशाख आईच्या साडीचा शिवला आहे…लग्न खरेदीत वेष्टनासाठी पॉलिथिनचा खूप वापर होतो.
  • पॉलिथिनमुक्त विवाह करण्यासाठी जुन्या साड्या व पोशाखांच्या पिशव्या व साडी कव्हर शिवले. ते पॅक करण्यासाठी सेफ्टी पिन वापरल्या…तर सजावट कागदाच्या फुलांनी केली आहे.
Previous article#Bollywood | आमिर-करीना की ‘लाल सिंह चड्ढा’ अब बैसाखी पर आएगी
Next article@indiannavy | स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज होणार नौदलात दाखल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).