Home BJP Chandrashekhar Bawankule । ‘पक्षाने विश्वास टाकला, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’

Chandrashekhar Bawankule । ‘पक्षाने विश्वास टाकला, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’

999

मुंबई / नागपूर ब्युरो : विधान परिषद निवडणुकीच्या 5 जागांसाठी काल भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, बावनकुळे पक्षाचा प्रत्येक कार्यक्रमात जोमाने काम करत राहिले.

अनेक आंदोलनांचं नेतृत्वही बावनकुळेंनी केलं. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पक्षाचे आभार मानले, तसंच पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

बावनकुळे म्हणाले की, पक्ष श्रेष्ठीने पुन्हा विश्वास टाकला आहे. सर्वांचे आभार मानतो. मी बाहेर होतो पण पक्षाचे काम करत होतो. माझं तिकीट कापलं तेव्हा मी नाराज नव्हतो. पक्षाचं काम करत राहिलो. आता पक्षाला वाटलं तेव्हा मला पुन्हा संधी दिली आहे. आमच्या पक्षात ओबीसी किंवा जात बघून उमेदवारी दिली जात नाही. मला तिकीट दिलं नव्हतं म्हणून भाजपला विधानसभेत फटका बसला असं म्हणता येणार नाही. त्याचं कारणं वेगळी आहेत. आता पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करेन, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

भाजपच्या अनेक आंदोलनांचे केले बावनकुळेंनी नेतृत्व

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले होते. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी यशस्वी नेतृत्व केलं. पक्षासाठी काम करत राहिल्याचं फळ आता बावनुकळेंना मिळालं आहे. त्यांना नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडूनस संधी देण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची राजकीय कारकीर्द
 1. 13 जानेवारी 1969 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म
 2. खसाळा, ता. कामठी येथे जन्म, बीएसटी फर्स्ट इयर पर्यंत शिक्षण
 3. 1990 पासून कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी संघर्ष
 4. 1990 साली ‘छत्रपती सेना’ स्थापना
 5. 1995 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
 6. 1997 मध्ये कोराडी क्षेत्रातून भाजप चर्फे जिल्हा परिषद निवडणूकीत विजय
 7. भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष
 8. 2004 मध्ये कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार
 9. चार वेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार
 10. 2019 ला ऊर्जा मंत्रीराज्य उत्पादन शुल्क मंत्री
 11. सध्या भाजप प्रदेश सरचीटणीस
Previous articlePF अकाउंट होल्डर्स के लिए EDLI स्कीम के तहत फ्री में मिलता है ₹7 लाख तक का फायदा
Next article#Chandrapur । वाघानं घेतला महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).