Home Election #Maharashtra । विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, 10 डिसेंबर रोजी मतदान, 14...

#Maharashtra । विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, 10 डिसेंबर रोजी मतदान, 14 ला मतमोजणी

512
राज्यातील 5 मतदारसंघातील विधानपरिषदेच्या 6 जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एकूण 8 विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामदास कदम, काँग्रेस नेते भाई जगताप यांचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होईल.

यामध्ये मुंबईतील दोन जागा आहेत. तर कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत आली असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहे. 6 जागांवरील सर्व सदस्यांची विधानपरिषदेवरील मुदत ही 1 जानेवारी 2022 रोजी संपणार आहे.

विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणाऱ्या नेत्यांमध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल, शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया, गिरीश व्यास, भाजपचे प्रशांत परिचारक, अरुण जगताप या नेत्यांचा समावेश आहे.

#Bollywood | 100 करोड़ के क्लब में अक्षय की फिल्म की एंट्री, चौथे दिन कितनी कमाई हुई?

Previous article@nawabmalikncp । मलिक म्हणाले- आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू; उद्या सकाळी पर्दाफाश करणार
Next article@msrtcofficial । एसटी महामंडळाची मोठी कारवाई: राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचारी निलंबित!
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).