Home BJP #nagpur । एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पुन्हा भाजयुमोचे धरणे सुरू, अनेक कार्यकर्त्यांना...

#nagpur । एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पुन्हा भाजयुमोचे धरणे सुरू, अनेक कार्यकर्त्यांना अटक

590

नागपूर ब्युरो : राज्यातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलने स्तगित केले असले तरी राज्यातील काही भागातील एस.टी कर्मचारी संपावर आहेत. नागपुर शहरात एस.टी कर्मचार्यांच्या समर्थनात काल भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, आ. गिरिषजी व्यास यांच्या नेतृत्वात भाजपने धरणे केले.

या वेळी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी समाजमाध्यमांशी बोलतांना सांगितले की एस.टी कर्मचार्यांना जेव्हा पर्यंत न्याय मिळत नाही तेव्हा पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, त्याचाच प्रत्यय म्हणुन भाजयुमोतर्फे आज सकाळी ६ वाजता पासुनच एस.टी महामंडळाच्या गणेशपेठ आगार येथे आंदोलनाची सुरवात झाली. राज्य सरकारने किती ही दबाव आणला तरी भारतीय जनता पार्टी एस.टी कर्मचाऱ्यांसोबत ताकदीने उभी आहे असा विश्वास यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

आजच्या आंदोलनाला प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविणजी दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सोबत भाजजुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, संपर्क प्रमुख सचिन सावरकर, घनश्याम ढाले, संकेत कुकडे, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, अक्षय ठवकर, गौरव हरडे, सागर गंधर्व, अथर्व त्रिवेदी, सौरभ पारशर, रितेश पांडे, अन्नू यादव, राहुल सावडिया, अर्पित मलघाटे, अक्षय शर्मा, नेहल खानोरकर, पवन महाकाळकर, नितिन ईटनकर, शैलेश नेताम, शंकर विश्वकर्मा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

@atullondhe | भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राशी दुजाभाव करणा-या मोदींच्या विरोधात काळ्या फिती लावून बोंबा माराव्यात

Previous article#National_Unity_Day | आखिर सरदार पटेल की जयंती पर क्यों मनाया जाता है राष्ट्रीय एकता दिवस?
Next articleसेमीफाइनल के लिए अहम मुकाबला, 18 साल से ICC इवेंट्स में कीवियों से नहीं जीती टीम इंडिया
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).