Home हिंदी कंगना ची बालिश बडबड अंगलट आली, मुंबईकरांची आता सटकली!

कंगना ची बालिश बडबड अंगलट आली, मुंबईकरांची आता सटकली!

678

चर्चेत राहण्यासाठी सतत वाह्यात, बालिश बडबड करणारी बॉलिवूड ची कंगणा राणावत हिने मुंबई पोलीस व त्यानंतर मुंबईबद्दल बालिश बडबड केल्याने ती आता ट्वीटर वर चांगलीच अडचणीत आली आहे. मुंबईकरांची आता सतकल्याने सर्वच तिच्यावर तुटून पडले आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणात दररोज काही ना काही वादग्रस्त बोलुन सोशल मीडिया मध्ये सर्वांचे लक्ष्य वेधून घेण्याच्या नादात तिने आपल्या अकलेचे तारे तोडत मुंबईला पाकव्याप्त काश्मीर (POK) म्हटले आहे. तिच्या या मूर्खपणावर मुंबईकर खूपच संतापलेत.

मराठमोडी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगनाविषयी संताप व्यक्त केला. पाकव्याप्त काश्मीरसोबत मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असा सणसणीत टोला तिला लगावला.

सोशल मीडियावरही कंगणा ट्रोल झाली. अनेकांनी कंगणाच्या बडबडीला उत्तर देत, ‘मुंबई मेरी जान’ असे म्हटले तर मुंबईने आपणास कशी ओळख दिली याचे वर्णनही केले.
मुंबई नेहमीच बाहेरील राज्यातील नागरिकांना आपलेसे करते. ते इथं पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान कमवतात आणि त्या बदल्यात मुंबईला परत काय देतात? असा संतप्त सवाल नेटक-यांनी केला आहे. आतातर #आमचीमुंबई #कंगणा_रनौट_चल_निकल_पड , हे हॅशटॅग तुफान ट्रेंड करत असून, नेटक-यांनी या माध्यमातून कंगणाला भरपूर सुनावले आहे.