Home Congress #gadchiroli । गडचिरोलीत काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन, 1 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण...

#gadchiroli । गडचिरोलीत काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन, 1 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा

559
गडचिरोली ब्युरो : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने सोमवार, दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ला दुपारी 12 वाजता शहरात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने राज्याचे दोन दमदार मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष एकाच मंचावर येणार असल्याने हा कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा म्हणजे काँग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी खूपच उत्साहित दिसत आहेत. गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास तथा क्रीडामंत्री सुनील भाऊ केदार, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु भाऊ धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे, आमदार अभिजीत वंजारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे : प्रा. समशेर खा पठाण

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी चे महासचिव प्रा. समशेर खा पठाण यांनी गडचिरोलीत 1 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे. प्रा. समशेर पठाण यांनी म्हटले आहे की या मेळावा आणि सोहळ्याच्या निमित्ताने सर्व काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी एकजूट होऊन काँग्रेस पक्षाची खरी ताकत दाखवून देऊया.

@NANA_PATOLE | भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले

Previous article@msrtcofficial । एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यातही वाढ
Next article@MumbaiNCP | मोहन ठाकरे को राकांपा उद्योग -व्यापार प्रदेश उपाध्यक्ष पद का जिम्मा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).