Home Legal #maharashtra । परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

#maharashtra । परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

359

मुंबई ब्युरो : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित कोर्टात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील अँटिलिया स्फोटके प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात 100 कोटी वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले जात असल्याच्या गंभीर आरोपाचा समावेश होता. देशमुख यांच्यावर वसुलीबाबतचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाणे आणि मुंबईत सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

#maharashtra । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करणार

Previous article#FashionShow | होटल सेंटर प्वाइंट में ग्रैंड फिनाले, रैंप पर उतरी मॉडल्स ने खूब बिखेरा जलवा
Next article#PAKODEWALA | न्यू नागपुर के मनीष नगर में हुई शुरुआत, पहले ही दिन दिखा उत्साह
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).