Home हिंदी पूरग्रस्त पिपरी गावाची खासदार तुमाने यांनी केली पाहणी

पूरग्रस्त पिपरी गावाची खासदार तुमाने यांनी केली पाहणी

594
  • प्रशासनाला सर्वेक्षण व मदत करण्याचे निर्देश

नागपूर : संततधार पावसाने पूरस्थितीची पाहणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज केली. त्यांनी कन्हान नजीकच्या पिपरी या गावाला भेट देत नागरिकांना दिलासा दिला. यावेळी प्रशासनाला पुरामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट व नागरिकांना मदत करण्याचे निर्देश दिले.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागपूर जिल्ह्यात कन्हान व तिच्या सहाय्यक सर्व नद्यांना पूर आला आहे. कन्हान नदीचे पाणी अनेक ठिकाणी मिळेल त्या दिशेने सुटले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषदेत सामील असलेले पिपरी गावाला कन्हान नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पिपरी तील नागरिकांना पुराचे पाणी गावात शिरल्याने पलायन करावे लागले. पुराच्या पाण्यात अनेक घरे पूर्णता बुडली होती, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली. पूरग्रस्तांना धान्याच्या कीट वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या राहण्याची सोय तात्पुरती जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना पूरपरिस्थितीची माहिती दिली असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष आष्टनकर, उपजिल्हा प्रमुख वरदराज पिल्ले, युवसेनेचे पदाधिकारी शुभम डवले, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.