नागपूर ब्युरो : राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली होती, मात्र निकालाअंती काँग्रेस 9 जागांवर विजय मिळवून 1 नंबर, तर भाजप 3 जागांवर विजय मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे मोठे नुकसान झाले असे वाटत असले तरी गेल्यावेळी पेक्षा केवळ 1 जागा भाजपची कमी झाली आहे. पंचायत समित्यांमध्ये मात्र भाजपाच्या जागा वाढल्या आहेत.
काटोल मध्ये आ. डॉ. परिणय फुके इफेक्ट
भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी काटोल विधानसभा मतदार संघातील काही भागात निवडणुकीच्या काळात ठाण मांडले होते. आमदार फुके यांच्या प्रयत्नांना यश येत सावरगाव जिल्हा परिषद, सावरगाव पंचायत समिती, पारडसिंगा जिल्हा परिषद, लाडगाव आणि बेलोना पंचायत समिती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. माजी गृहमंत्री आणि राकांपा चे नेते अनिल देशमुखांना मोठा धक्का बसला आहे. 4 जागांपैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवर शेकापचा विजय झाला आहे.
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
- केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस
- वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस
- राजोला- अरुण हटवार- काँग्रेस
- गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस
- वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस
- आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस
- करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस
- निलडोह- संजय जगताप- काँग्रेस
- गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस
- येनवा- समीर उमप- शेकाप
- डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी
- भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी
- बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना
- पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप
- सावरगाव – पर्वता काळबांडे- भाजप
- डिगडोह-इससानी- अर्चना गिरी- भाजप