Home Legal कोर्टाचे आदेश । साई मंदिराचे कामकाज तदर्थ समीतीच पाहणार, 19 नंतर नव्या...

कोर्टाचे आदेश । साई मंदिराचे कामकाज तदर्थ समीतीच पाहणार, 19 नंतर नव्या विश्वस्त मंडाळाकडे पदभार

495
औरंगाबाद ब्युरो : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला पदभार स्वीकारण्यास अखेर मुहुर्त लागला. 19 आॅक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हायकोर्टाने गठित केलेली तदर्थ समिती कारभार पाहणार आहे. त्यानंतर नवीन विश्वस्त मंडळ या समितीकडून पदभार स्वीकारेल. सोमवार, 4 ऑक्टोबर ला न्या. रविंद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांच्यासमोर सुनावणी झाली असता, खंडपीठाने याविषयीचे वरील आदेश दिले.
विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले

या 16 सप्टेंबर रोजी बारा सदस्यीय नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. या मंडळात अध्यक्ष आशुतोष काळे आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. जगदीश सावंत यांच्यासह नऊ सदस्य आणि एक पदसिद्ध सदस्य आहे. यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने कार्यरत तदर्थ समितीकडून कारभार हस्तांतरण न करता नवीन विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारत कारभार सुरु केल्याचे मत व्यक्त करत मंडळाचे अधिकार गोठवले होते. सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने 24 सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश 19 आॅक्टोबर रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कायम ठेवला आहे. तोपर्यंत तदर्थ समिती कामकाज पाहील. प्रकरणात याचिकाकर्त्याला नवीन याचिका दाखल करण्याची औरंगाबाद खंडपीठाने मुभा दिली.

उत्तमराव शेळके यांनी दिले होते आव्हान

विश्वस्त मंडळ साईबाबा संस्थान कायदा 2004, विश्वस्त नेमणूक नियम 2013, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यात आले. उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता समितीने घाईत पदभार घेऊन कामकाज सुरु केल्याने या नवनियुक्त मंडळाला माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांची बाजू अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे आणि अ‍ॅड. उमाकांत आवटे यांनी मांडली. विशेष सरकारी वकील आर. एन. धोर्डे यांनी युक्तीवाद केला तर विश्वस्त मंडळाच्यावतीने अ‍ॅड. अनिल बजाज यांनी काम पाहिले.

असे आहे विश्वस्त मंडळ-

1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6. सचिन रंगराव गुजर – सदस्य
7. राहुल कनाल – सदस्य
8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

कोण आहेत आशुतोष काळे?

35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

Previous articleMAHARASHTRA | केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले
Next articleSocial Media | वाट्सऐप, फेसबुक और इंस्टाग्राम को ट्विटर का सहारा, डाउन सर्वर से यूजर्स हुए परेशान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).