Home Bollywood Big News । क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी : शाहरुख खानचा मुलगा आर्यन...

Big News । क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी : शाहरुख खानचा मुलगा आर्यन एनसीबीच्या ताब्यात

606
मुंबई ब्युरो : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.

Previous articleपीएफ पेंशन | यह फॉर्म नहीं भरा तो नहीं मिलेगी कंपनी से पेंशन की राशि
Next articleCovid-19 | क्या लग गया है देश में कोरोना की रफ्तार पर ब्रेक, क्या कहते हैं आंकड़े?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).