Home Maharashtra Gadchiroli News । विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विरोधात अहेरी पोलिसांत तक्रार

Gadchiroli News । विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विरोधात अहेरी पोलिसांत तक्रार

617

महिलांना उद्देशून लज्जास्पद वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे करण्यात आली तक्रार

अहेरी ब्युरो : पुणे जिल्हातील शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंतीनिमित्य आयोजित एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य केले असून याबाबत विविध टीव्ही चॅनल आणि सोशल मीडिया मध्ये त्यांची क्लिप वायरल होत आहे. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या जिल्हाध्यक्ष शाहीन जमीर हकीम यांनी अहेरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे

प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिला वर्गाच्या भावना दुखावल्या असून महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन दरेकर यांनी महिलांच्या विनयशीलतेचा अपमान केला आहे. तसेच अश्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचून दोन गटांमध्ये तेढ निर्माण केली आहे.सदर वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला मलिन व बदनाम करण्यात आले आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य हा दखलपात्र गुन्हा असून त्यांच्याविरुद्ध कलम 153 बी, 500 व 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती कारवाई करावी असे ही शाहीन जमीर हकीम यांनी नमूद तक्रारीत मागणी केली आहे.

या वेळी अहेरी महिला विधानसभा प्रमख पुष्पा अलोने, माजी जि. प अध्यक्ष सौ आशाताई पोहणेकर, माजी नगरसेविका ममता पटवर्धन, आरती डुकरे, कल्पना उरेते, सौ शकुंतला मडावी, माजी नगरसेवक शैलेश पटवर्धन,.बाबू शेख व मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.