Home Crime Nagpur । उपराजधानीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त

Nagpur । उपराजधानीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त

नागपूर ब्युरो : नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. बुट्टीबोरी पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे. कॉफी घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गांजा ठेवण्यात आला होता. मात्र ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी गांजा जप्त केला.

1 कोटींचा गांजा जप्त

आरोपींकडे जवळपास 1105 किलो गांजा होता. या गांजाची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये एवढी होती. तेलंगणा राज्यातून ही खेप आली होती. कॉफी घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये 1105 किलो गांजा ठेवण्यात आला होता. नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून करण्यात कारवाई केली. तर एका दुसऱ्या घटनेत नागपुरातील एक हेड कॉन्स्टेबल ओरिसामध्ये गांजा तस्करी करताना ओरिसा पोलिसांनी अटक केलीय. रोशन उगले असं त्याच नाव असून तो नागपुरातील वाथोडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. एकीकडे नागपूरच्या ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळाली तर दुसरीकडे पोलीसाला अटक झाली. सध्या तो सुट्टी वर असल्याची माहिती समोर येत आहे.

काल्या डांगरेच्या हत्येचा उलगडा : 450 रुपयांच्या उधारीतून जीव गमावला

नागपूरच्या पारडी भागात रविवारी झालेल्या काल्या डांगरेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. उधारीचे 450 रुपये परत न केल्याने गोट्या दुर्गुडे आणि पियुष पंचबुद्धे यांनी घरात घुसून त्याची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. मयत काल्या डांगरे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो पारडी परिसरात अवैध दारू विक्री करायचा. काही दिवसांच्या पूर्वी काल्याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरुन काल्या आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादातून धारदार शस्त्राने वार करत आरोपींनी काल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here