Home Maharashtra Nagpur। शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

Nagpur। शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

639

नागपूर ब्युरो : नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयंरोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमासंदर्भात नागपुरात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं यासाठी प्रयत्न

खादी व ग्रामोद्योग आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रासंदर्भात गरजू तरुणांना माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना “या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लागले आहेत. त्यावरून दिसून येतं की रोजगार कसे निर्माण होतात. या उद्योगांना बळ ध्यायचं महत्वाचं काम आहे. कोरोनानंतर या उद्योगांना मदत केली तर ते चांगले होऊ शकतात. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे फडणवीस म्हणाले.

शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत योजना

तसेच पुढे बोलताना हा कार्यक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी सगळे प्रतिनिधी काम करतील. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातून रोजगार निर्मिती होईल. योजना सुलभ करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काम केलं. योजना अनेक तयार होतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी बोलवून दाखवली.