Home मराठी Nagpur Metro । नागपूरच्या कायापालटासाठी महा मेट्रोचा प्रयत्न, 20 मजली इमारतीच्या बांधकामाकरिता...

Nagpur Metro । नागपूरच्या कायापालटासाठी महा मेट्रोचा प्रयत्न, 20 मजली इमारतीच्या बांधकामाकरिता निविदा

नागपूर ब्युरो : नागपुरात आधुनिक, पर्यावरण पूरक, स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करतानाच, महा मेट्रो शहराचा कायापालट देखील करीत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशाचे भौगोलिक मध्य असलेल्या झिरो माईल स्मारकाजवळ 20 मजली इमारतीच्या बांधकामाकरता महा मेट्रोने निविदा काढली आहे. महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा भाग असलेले झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन याच इमारतीत स्थित असेल.

पीपीपी मॉडेलवर आधारित असेल बांधकाम

या 20 मजल्यांपैकी पैकी 2 भूमिगत मजले पार्किंग करता आणि उर्वरित 18 मजले इतर विविध कामांकरिता वापरले जातील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 89.81 मीटर उंच स्टेशन बांधण्याची परवानगी महा मेट्रोला दिली आहे. महा मेट्रोच्या पार्किंग व व्यावसायिक बांधकामा करण्याच्या धोरणांतर्गत पीपीपी मॉडेल वर आधारित या वस्तूचे बांधकाम होणार आहे.

2,90,000 हजार चौरस फुटांचं बांधकाम

या वास्तूचे बांधकाम करू इच्छिणाऱ्या कंत्राटदाराला स्टेशनच्या वरती 2 लाख 90 हजार चौरस फुट बांधकाम करायचे आहे. या इमारतीत पार्किंग करिता बांधल्या जाणाऱ्या 2 भूमिगत मजल्यांशिवाय 2 मजले – तळ मजला आणि मेझानैन मजला – देखील पार्किंग करता वापरले जाणार आहे. या व्यतिरिक्त स्टेशनच्या कोंकोर्स परिसरात तिकीट विक्री आणि किरकोळ विक्री करता दुकानांची सोय असेल. या इमारतीत एकूण १३ मजल्यांचा वापर व्यावसायिक कामाकरिता होणार आहे.

हॉटेल, बँक्वेट हॉल, ऑफिस आणि इतरही बरंच काही!

संबंधित कंत्राटदार या इमारतीत हॉटेल, बँक्वेट हॉल, ऑफिस आणि इतर बांधकाम करू शकतो. या संबंधी कंत्राटदार निर्णय घेऊ शकतो. हे बांधकाम, आधी सांगितल्याप्रमाणे, देशाच्या मध्य भागी असलेल्या झिरो माईल स्मारकाजवळ होणार आहे. या स्मारकाचे बांधकाम 1907 मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारने केलेल्या ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान झाले आहे. देशांतर्गत विविध शहरांमधील अंतर मोजण्याकरिता हे सर्वेक्षण झाले होते.

पार्किंग करता असलेल्या एकूण चार मजल्यांपैकी एक मजला कंत्राटदाराकरता असेल.व्यावसायिक कारणाकरिता झिरो माईल स्टेशनच्या वरच्या भागात बांधकाम व पार्किंग परिसराचे संचालना संबंधीची निविदा महा मेट्रोच्या संकेत स्थळावर लाइव्ह असून 21 सप्टेंबर 2021 पर्यंत या निविदेत भाग घेता येते. या संबंधीचे प्री-बीड बैठक 12 ऑगस्ट 2021 रोजी मेट्रो भवन येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here