Home मराठी world cadet wrestling championship । भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड...

world cadet wrestling championship । भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

एकीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.

हरियाणाच्या क्रिडा मंत्र्याकडून अभिनंदन

प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलंय, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिंच अभिनंदन.”

Previous articleNaxal Encounter | सुरक्षा बल के जवानों व नक्सलियों के बीच मुठभेड़, दो नक्सली मारे गए
Next articleCorona Yoddha | राम अहिरवार हैं ऐसे शख्स जो दावे से कह सकते है- “मैं ग़रीबों का दिल हूँ वतन की ज़बान”
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).