Home मराठी Nagpur । देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, भाजपची निदर्शने

Nagpur । देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, भाजपची निदर्शने

नागपूर ब्यूरो : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप ने केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता संविधान चौक येथे निदर्शने करण्यात आली.