मुंबई ब्यूरो: प्रस्तावीत विद्युत कायदा -2021 या बिलास राज्यसभेत शिवसेना पक्षा तर्फे विरोध करून आवाज उठविण्याची आणी देशव्यापी संपास पाठींबा देण्यासाठी तसेच विद्युत क्षेत्राच्या खाजगीकरणाचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी मुंबई येथे वीज कामगार, अधिकारी व अभियंते संघर्ष कृती समिती यांचे शिष्टमंडळाने दि.26 जुलै रोजी शिवसेना राज्यसभा गटनेते खा. संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व आंदोलना बाबत चर्चा केली.
सुधारित विघुत कायदा-2021 चे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आल्यास त्याला शिवसेना कडाडून विरोध राहील. तसेच शिवसेना खा. अनिल देसाई अध्यक्ष स्थानिय लोकाधिकार समिती हे सदर विधेयकावर राज्यसभेत चर्चेत सहभागी होऊन ठामपणे विरोध करतील असे आश्वासन संजय राऊत यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख व पक्षाची भुमिका विशद करताना म्हणाले की शिवसेना नेहमी अन्यायग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशातील विज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांचे सोबत शिवसेना पक्ष राहील. आंदोलनात विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेच्या सक्रिय सहभागा बाबत खा.संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले.
सरकारच्या मालकीच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्या ह्या खाजगी भाडंवलदाराना विकण्याचे केंद्र सरकारचे हे षडयंञ आहे असे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अगोदर खा.अरविंद सावंत शिवसेना उपनेते व अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघ यांचेबरोबर सुद्धा चर्चा केली होती. त्यांनी विद्युत विधेयकाच्या विरोधात लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले होते. आता शिवसेना सचिव बिलाला राज्यसभेत विरोध करणार असल्यामुळे संजय राऊत यांचे आभार मानले.
चर्चेत म.रा.विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे अध्यक्ष राजनभाई भानुशाली, तसेच सब ऑर्डीनेट इंजिनिअर संघटनेचे संजय ठाकूर, वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस क्रृष्णा भोयर, विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्याध्यक्ष विनायक जाधव, उपाध्यक्ष दिपक जाधव, मुंबई अध्यक्ष विनोद गोसावी मुंबई परिमंडळ सचिव पुरुषोत्तम रणभोर उपस्थित होते.