Home Maharashtra ट्विटर वर अमृता फडणवीस का म्हणाल्या – “ढूँढोगे तो मुजरिम एक ना...

ट्विटर वर अमृता फडणवीस का म्हणाल्या – “ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!”

मुंबई चे संतप्त नेटकरी म्हणाले आधी नागपूरचे हाल बघा

आत्मनिर्भर डॉट कॉम पोलिटिकल डेस्क, मुंबई/नागपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिनी अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेत असतात. सोशल मेडिया मध्ये कधी वेगवेगळ्या पोज मधील त्यांच्या फोटोंचे पोस्ट चर्चेचे कारण बनतात तर कधी अमृता फडणवीस यांनी केलेली कॉमेंट राजकीय लोकांच्या जिव्हारी लागत असते. यावेळी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर मुंबईत झालेल्या पावसामुळे ठीक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा मुद्दा उचलून धरला आहे.

त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यासमोर उभे राहून फोटो काढले आहे. या फोटोला सोशल मीडियामध्ये शेअर करताना त्यांनी हिंदी मध्ये “इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !” अशी बोचरी कॉमेंट केली आहे. मुंबईच्या अशा दुरावस्थेवर त्यांनी ही पोस्ट केल्याने अनेक लोकांना ती खूप आवडली देखील आहे.

ट्विटर वर 9.4k लोकांनी त्यांच्या या पोस्टला लाईक केले आहे तर 1.3k लोकांनी त्यांची ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र ज्याप्रमाणे त्यांच्या या पोस्टला लोकांची पसंती मिळाली आहे, तशीच अनेक नेटकऱ्याना त्यांची ही पोस्ट अजिबात आवडलेली नाही. मुख्यत्वे काही मुंबईकरांनी अमृता फडणवीस यांना आरसा दाखवत म्हटले आहे की आधी तुमच्या नागपूरचे हाल बघा.

नम्रता नावाच्या एकाने नेटकरी ने तर नागपूर येथील चार फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांना या फोटोवर सुद्धा डाउन थम्ब द्या असं म्हटलं आहे. अनिल बिडकर नावाच्या एका नेटकरी ने म्हटले आहे, “मला एक गोष्ट कळत नाही मुंबईवर आपण इतकी आगपाखड का करता? उद्धव ठाकरे साहेब देशातील नंबर 1 मुख्यमंत्री आहेत.. He आता पुराव्याणीशी सिद्ध झालंय. मुंबईत हाय टाईड ला पाणी तुंबते हे सर्वश्रुत आहे. आम्हा मुंबईकरांना काहीही विशेष वाटत नाही. मान्सून एन्जॉय करा.”

 

Previous articleSSC Result । अकोला जिल्ह्याचा निकाल 99.99%, केवळ दोन विद्यार्थी नापास, एक मुलगा-एक मुलगी अनुत्तीर्ण
Next articleNaxal Claim | फादर स्टेन स्वामी की कस्टडी में मौत नहीं, ह्त्या हुई
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).