Home मराठी Maha Metro । स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय...

Maha Metro । स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय सांडपाणी, महा मेट्रोच्या नवीन प्रणालीला डीआरडीओ ची मंजुरी

नागपूर ब्युरो : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात सांडपाणाच्या पुनःउपयोगासाठी बायो- बायोडायजस्टर टँक आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली असून महा मेट्रोने नेहमीच पर्यावरण पूरक बाबींना प्राधान्य दिले आहे. महा मेट्रोने डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइज़ेशन (DRDO) द्वारे पेटंट टेक्नॉलॉजी बायोडायजस्टरला नव्याने डिजाईन करून मोठा बदल केला आहे. ज्यामुळे सांडपाणी रिसायकलिंग सिस्टमचा आकार कमी झाला असून त्याची क्षमता व गुणवत्ता मध्ये कुठलाही परिणाम झाला नाही . या नवीन प्रणालीला डीआरडीओ ने मंजुरी दिली आहे .

2016 मध्ये झाला होता करार

उल्लेखनीय आहे कि, जून 2016 मध्ये डीआरडीओ व महामेट्रो दरम्यान बायोडाईजेस्टर तंत्रज्ञान संबंधी सामंजस्य करार झाला होता. महा मेट्रोने सदर बायोडायजस्टर सर्व स्टेशन व कार्यालय मध्ये लावण्याचा निर्णय घेतला, परंतु सदर प्रणाली मोठ्या प्रमाणात जागा घेत असल्याचे निदर्शनास आले म्हणून महामेट्रो अधिकाऱ्यांनी या सयंत्राला नव्याने डिजाईन केले. ज्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली. अद्यावत तंत्रज्ञासह केवळ बायो-डायजेस्टर+रीड बेड तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.

दररोज 900 लिटर पाण्याची बचत

नव्याने डिजाईन करण्यात आलेले बायोडायजस्टर यशस्वीपणे कार्यरत असून एकूण 14 बायोडायजस्टर (जुने व नवीन ) कार्यरत आहे. यातुन निघणारे सांडपाणी स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी पुनः वापरला जाते. या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळेस नव्याने लागणाऱ्या पाण्याची गरज राहत नाही. यामुळे अनुमानितपणे साधारणतः 30 टक्के म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर सुमारे 800 ते 900 लिटर पाण्याची बचत दर दिवशी होत आहे. मोजक्या जागेत कमीत कमी खर्चात पारंपारिक पद्धतीने वॉटर रिसायकलिंगची प्रक्रिया राबविली जाते. तर या प्रक्रियेमुळे इतरत्र कुठेही सांडपाणी जमा राहण्याची शक्यता राहत नाही

या प्रणालीची वैशिष्टये पुढील प्रमाणे :

  1. इकोफ्रेंडली व स्वस्त तंत्रज्ञान
  2. कमी जागेची आवश्यकता
  3. कुठलाही निरुपद्रवी (कचरा) व दुर्गंध बाहेर येत नाही तसेच कमी रखरखाव
  4. सांडपाण्याचा पुनःवापर
  5. जमिनीतील पाणी दूषित होणार नाही
  6. भारतात सर्व वातावरणात यशस्वी

    महा मेट्रोने नव्याने डिजाईन केलेल्या बायोडायजस्टर प्रणाली सर्व मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे. .

Previous articleDelta Plus । डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो की नाही ?
Next articleNagpur । चक्क नागपूरच्या रस्त्यावर फिरत होते 22 किलो वजनाचे दुर्मीळ कासव…!
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).