Home मराठी Nagpur । कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवा, खा. तुमाने यांची कोराडी महानिर्मिती केंद्रात...

Nagpur । कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवा, खा. तुमाने यांची कोराडी महानिर्मिती केंद्रात आढावा बैठक

नागपूर ब्युरो : कोराडी येथील महाजेनको वीज केंद्रात कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्या निदर्शनास येत आहेत. हे कामगार कंत्राटी असले तरी ते वीजकेंद्रात काम करीत असल्याने त्याच्या समस्या या वीज केंद्रामार्फत सोडविण्यात याव्या, त्यासाठी अधिका-यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना रामटेकचे शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांनी केल्या.

कोराडी वीज केंद्रात काम करणा-या कंत्राटी कामगारांनी खासदार श्री कृपाल तुमाने यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तर कधी पत्राद्वारे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी खा. श्री तुमाने यांनी कोराडी वीज केंद्रात नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील, राजकुमार तास्कर, राजेश कराळे, अनिल आष्टीकर, शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष शुभम नवले, अमोल गुजर, राजन सिंग, समीर सोनारे, विनोद सातंगे, राज तांडेकर, बंटी तातोडे, पलाश काकडे, एमएसईबी कंत्राटदार संघटनेचे रत्नदीप रंगारी यांच्यासह कंत्राटदार कंपनींचे अधिकारी उपिस्थत होते.

खासदार श्री कृपाल तुमाने म्हणाले, वीज केंद्रात तीन हजाराहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. हे वीज केंद्रातील एकूण कर्मचा-यांच्या दुपटी येवढे आहे. याचा अर्थ वीज केंद्राचे बहुतांश काम कंत्राटी कर्मचा-यांकडून करून घेतले जाते. यामुळे त्यांच्या अडचणी जास्त असतील. त्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यात याव्यात. काही कंत्राटदार मुजोरी करीत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यांच्यावर वेळीच लगाम लावण्याचे निर्देश वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांना दिले.

खासदार श्री तुमाने यांनी कोराडी येथील जुन्या व नवीन वीज केंद्राची माहिती जाणून घेतली. यात केंद्राची वीज निर्मिती, कोळसा पुरवठा, कोविड काळातील समस्या, भविष्यातील केंद्राच्या योजना याविषयी माहिती केंद्रातील अधिका-यांनी दिली