Home मराठी महाराष्ट्र सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, सीएमओ चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, सीएमओ चं स्पष्टीकरण

मंत्री विजय वडेट्टीवारांनी केली होती घोषणा- राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक

मुंबई ब्युरो : महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. “सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक आणि लॉकडाउन केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल”, अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताप अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तुर्तास कायम असल्याचंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं राज्य सरकारने सांगितलं आहे.

‘अधिकृत निर्णय कळवला जाईल’
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे, ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असंही राज्य सरकारने आपल्या निवदेनात म्हटलंय.

लेवल एकमध्ये या जिल्ह्यात होणार होते अनलॉक
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.

Previous articleNagpur Metro । झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत धावली मेट्रो
Next articleMaharashtra | 5 फेज में अनलॉक होगा राज्य, 5% पॉजिटिविटी रेट वाले जिलों में मिलेगी राहत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).