Home Health Nagpur । गुटखा प्रमाणे तंबाखूवर बंदी घालून विक्री करणाऱ्यावर कारवाई करा :...

Nagpur । गुटखा प्रमाणे तंबाखूवर बंदी घालून विक्री करणाऱ्यावर कारवाई करा : पूजा मानमोडे

नागपूर ब्युरो : सोमवार ला (31 मे ) ह्युमँनिटी सोशल फाऊंडेशन नागपूर च्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त संविधान चौक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले.

तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने कॅन्सर व तत्सम आजार होतात, याची लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी फाऊंडेशन च्या वतीने जनजागृती अभियान राबविले.

यावेळी ह्युमँनिटी सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा पूजा मानमोडे म्हणाल्या “तंबाखू सेवनामुळे भारतात जवळपास 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावतात. त्यामुळे सरकार ने महाराष्ट्र राज्यात गुटखा वर जशी बंदी घातली तशी तंबाखू वर सुद्धा बंदी घालावी आणि बेकायदेशीर गुटख्याची विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी. संस्थेच्या वतीने युवक आणि युवतींना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी धूम्रपान आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे. तंबाखू सेवनाने आयुष्य हे 15 वर्ष कमी होत असल्याचं एका रिसर्च मधून समोर आले आहे.

यावेळी पूजा मानमोडे ( संस्थापक अध्यक्ष- ह्युमँनिटी सोशल फाऊंडेशन), वृंदाताई विकास ठाकरे ( राष्ट्रीय ओबीसी महिलामहासंघ शहर अध्यक्ष), अनिता ठेंगरे,वंदना वनकर, लीना निकम, स्वाती अहिरराव, चेतन गावंडे, ललित चांदेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here