Home हिंदी अबब….महात्मा गांधीच्या चष्म्याची बोली अडीच कोटी, इंग्लंडमध्ये लिलाव

अबब….महात्मा गांधीच्या चष्म्याची बोली अडीच कोटी, इंग्लंडमध्ये लिलाव

559

महात्मा गांधी यांचा सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा इंग्लंडमध्ये लिलाव झाला. या ऐतिहासिक चष्म्याला 2 कोटी 55 लाख रुपये इतकी किंमत मिळाली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरातील ‘ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स’ या लिलाव कंपनीने हा लिलाव आयोजित केला होता. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संग्रहकाने महात्मा गांधींचा हा चष्मा खरेदी केला आहे.

आत्मनिर्भर खबर डॉट कॉम ने या चष्म्याच्या लिलावा संबंधात आधीच बातमी दिली होती. त्यावेळी याला 14 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळू शकेल आणि कंपनीच्या इतिहासात हा सर्वात मोठा लिलाव असेल, असं ‘ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्स’ या कंपनीचे अधिकारी अँड्य्रू स्टो यांनी म्हटलं होतं.

या चष्म्याचे मालक ब्रिस्टलच्या मॅनगॉट्सफील्ड भागात राहतात. त्यांनी एका अत्यंत साध्या पाकिटात हा चष्मा कंपनीला लिलावासाठी पाठवला होता. कंपनीला तो 3 ऑगस्ट रोजी मिळाला. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी यांना हा चष्मा 1910 ते 1930 दरम्यान त्यांच्या काकांनी दिल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत कार्यरत होते. माहितीनुसार जवळपास 50 वर्षे हा चष्मा असाच एका कपाटात पडून होता. चष्म्याचे मालक अत्यंत वयस्कर आहेत. या लिलावातून मिळालेली रक्कम ती आपल्या मुलीला देणार असल्याचं ते सांगतात.