नागपूर ब्युरो : नागपुरातील वाडी येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना कळताच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाºयांशी बोलून या घटनेसंदर्भात माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्यात. आवश्यक सर्व ती मदत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांना सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समीर मेघे यांना सुद्धा या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुदैर्वी घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी आपण प्रार्थना करतो, असेही म्हटले आहे.
गडकरी यांनी केले टष्ट्वीट
वाडी येथील आगीच्या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सोशल मीडिया मध्ये एक पोस्ट केली. ते म्हणाले, ‘नागपुर जिल्ह्यातील वाडी येथील वेलट्रीट रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये कोविड वर उपचार घेत असलेल्या रूग्णांचा मृत्यु झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहेत.