Home Maharashtra Nagpur । लाव्हा गावात 250 वर्षांपासून होळी पंचमी पर्वा वर का धावतात...

Nagpur । लाव्हा गावात 250 वर्षांपासून होळी पंचमी पर्वा वर का धावतात बिना बैलाच्या बंड्या?

कोरोना संसर्गामुळे यावर्षी सादेपणाने होत आहे कार्यक्रम, गर्दी ची परवानगी नाही

लाव्हा गावात पोलिसांचा बंदोबस्त

नागपूर ब्युरो : महाराष्ट्राच्या विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या लाव्हा गावात अडीचशे वर्षांहून अधिक काळापासून बिना बैलाच्या बंड्या धावण्याची अविरत परंपरा सुरू आहे. दरवर्षी होळीच्या पंचमीला बिना बैलाच्या बंड्या या गावात धावतात. दरवर्षी याप्रसंगी हजारोच्या संख्येने लोक जमा होतात. मात्र कोरोना चे संकट बघता शासनाकडून लागू करण्यात आलेल्या दिशानिर्देश यांचे पालन करीत यावर्षी हे आयोजन साधेपणाने होत आहे.

गावात सकाळपासून जुन्या परंपरे नुसार पूजा, अर्चना केली जात आहे. दुपार ला गावात बिना बैलाच्या बंड्या परंपरेनुसार धावतील, अशी माहिती आहे. याकरिता गावकरी बंडया एकमेकांना बांधत आहेत. लाव्हा ग्राम पंचायतीच्या समोरूनच या बिना बैलाच्या बंड्या धावतील.

काय आहे परंपरा?

वाडी येथून जवळच असलेल्या खडगाव मार्गावरील लाव्हा गावात होळी च्या पंचमीला दरवर्षी बिना बैलाच्या बंड्या धावतात. ही परंपरा मागील सात पिढ्यांपासून या गावात निरंतर सुरू आहे. लाव्हा येथील गोरले परिवार मागील अडीचशे वर्षांपासून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करीत आहे. याप्रसंगी गावातील सर्व नागरिक एकत्रित होऊन सदर कार्यक्रम यशस्वी करतात. या परिवारातील सदस्य पंचमीच्या दिवशी हातात तलवार घेऊन आपल्या अनुयायी सोबत गावातील सोनबा बाबा मंदिरात जातात. तिथे विधिवत पूजा करतात आणि त्यानंतर बकर्‍याचा बळी दिला जातो.

एका उंच झुल्यावर गोरले बाबा ला झोपविण्यात येते. थोड्याच वेळाने या परिवारातील सदस्य तलवार घेऊन दही-भात समोर फेकून प्रथम क्रमांकाच्या बंडीवर चढतात. त्यांचे मागे इतर बंड्यावर 50 ते 60 भक्त एक दुसऱ्यांना पकडून उभे होतात. गोरले महाराजांनी हवेत तलवार फिरवून “होकरे हो– होकरे हो” अशी गर्जना करताच समोरच्या बंडीचे धूर 7 ते 8 भक्ता उचलून धरतात. बंड्या धावू लागल्या कि मागो माग गावचे सर्व नागरिक धावू लागतात.

लाव्हा येथून सोनबा नगर येथील पुरातन मंदिरात मार्ग क्रमण करून याचे समापण होते. हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून मोठ्या संख्येने नागरिक गावात येतात. लाव्हा गावाला यात्रेचे रूप येते. या कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व प्रतिष्टीत नागरिक, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी परिश्रम घेतात.

अंनिस म्हणते चमत्कार नव्हे, हे विज्ञान

अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर ने लाव्हा गावातील या परंपरे बाबत म्हटले आहे कि या उत्सवात बंड्या बिना बैलाच्या धावत नाहीत, त्याला मानवी बल दिल्या जाते, हा काही चमत्कार नाही. विज्ञानाच्या गती च्या नियमावर आधारित बल प्रतिक्रिया बल येथे कार्य करते.

Previous articleMaharashtra । ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही
Next articleMaharashtra Lockdown । मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).