Home Education HSC SSC Exam । कोरोनामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष...

HSC SSC Exam । कोरोनामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा : शिक्षणमंत्री

10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं आहे.

बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षेबाबत काही महत्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतले आहेत.

Previous articleMaharashtra । राज्यात येत्या रविवारपासून नाईट कर्फ्यू -मुख्यमंत्री ठाकरे
Next articleBhandup Fire । ड्रीम मॉलमधील आग 30 तासानंतर आटोक्यात, 11 रुग्णांचा घेतला जीव
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).