नागपूर : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भ्रमण करीत असल्याची विश्वसनीय माहीती आहे. मुख्य म्हणजे राज्याचे दोन सनदी अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत असल्याची माहीती मिळाली आहे.
राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असलेले आदित्य ठाकरे सध्या चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनावर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या समवेत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर सुद्धा आहेत.
Mumbai has more than 17 k COVID cases today!
— nitesh rane (@NiteshNRane) March 16, 2021
There r talks of second wave!
While all this is happening in Mumbai Guardian minister Aditya T is busy holidaying in “Tadoba” since a few days ??
Who will save Mumbai then?
नितेश राणेंंचे टष्ट्वीट
आ. नितेश राणे यांनी मंगळवारी रात्री 9.30 दरम्यान सोशल मीडिया वर एक टष्ट्वीट करून म्हटले आहे कि मुंबई मध्ये आज 17 हजारावर कोरोना केसेस आहेत. मात्र मुंबईचे पालकमंत्री काही दिवसांपासून ताडोबात भ्रमण करीत आहेत. अश्या स्थितीत मुंबईला कोण वाचविणार? असा सवाल देखील राणे यांनी विचारला आहे.