Home Maharashtra Success story । तिघी सख्ख्या बहिणी झाल्या पोलीस दलात भरती

Success story । तिघी सख्ख्या बहिणी झाल्या पोलीस दलात भरती

वाशीम ब्युरो : वाशीम च्या मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळाच्या वाघमारे कुटुंबातील तीन मुली पोलीस सेवेत दाखल झाल्याने मुलीही मुलांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे.

वाशीम मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा गावाचे नारायण वाघमारे यांच्या चार भावांमध्ये मिळून 4 एकर शेती म्हणजे प्रत्येकी एक एकर शेती यामध्ये प्रपंच चालवणे तसं कठीणच असल्याने मजुरीचा धंदा वाघमारे कुटुंब करतात. प्रिया, भाग्यश्री, श्रद्धा अशी त्या मुलीची नावे आहे. नारायण वाघमारे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. या तिन्ही मुलींना बारावी पर्यंतच शिक्षण दिलं आणि मोठी मुलगी प्रियाने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.

प्रथम पित्याच्या विरोधानंतर समाजाची चिंता सतावत होती लोक काय म्हणतील पोलीस खात्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत ते दूर कसे करायचे मुलींकरता क्षेत्र योग्य असेल का या सगळ्या गोष्टीला बाजूला करत प्रिया 2014 मध्ये पोलिस सेवेत दाखल झाली. वाशीमच्या मंगरूळपीरच्या तऱ्हाळा गावात प्राथमिक शिक्षण घेतले तर महाविद्यालय शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी केले. शिक्षणाचे धडे घेताना पोलीस प्रशिक्षण अकॅडमी चालविणाऱ्या अनिल मानेकर याचं लक्ष प्रिया वाघमारे यांच्याकडे गेले आणि शारीरिकदृष्ट्या पोलीस खात्याकरता उत्तम बांधा असल्याने प्रियाच्या पालकांची भेट घेतली विश्वासात घेतले. घरच्या सदस्याप्रमाणे शिक्षण ही दिले.

प्रियाच्या अपार मेहनतीवर ती पोलीस दलात नोकरीला लागली. थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि 2018 च्या पोलीस भरतीत दोघींचीही शिपाई पदासाठी निवड झाली. सद्यस्थितीत प्रिया वाशीमच्या आसेगाव पोलीस स्थानकामध्ये तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.

आई आणि वडिलांनी दिलेले चांगल्या संस्कारामुळे एका चांगल्या ध्येयापर्यंत तिन्ही बहिणींनी शिक्षणाबरोबर ठरवलेलं लक्ष पूर्ण केले. मात्र आईचं मन हळव असल्याने पोलीस दलात पाठवण्यासाठी दोन मत प्रवाह होते. तर समाजाच्या विचार श्रेणीचा विचार न करता नोकरीसाठी राजी झाले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. आता वडिलांना तिन्ही मुली पोलीस खात्यात चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडत असल्याच सार्थ अभिमान आहे. तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी वर्गामुळे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असून पोलीस दलात शिपाई पर्यंत सीमित न राहता पोलीस दलात मोठ्या पदावर जाण्याच तिन्ही बहिणींचे स्वप्न आहे.

Previous articleDr. Parinay Fuke । मासेमारी करणाऱ्यांना तलावाचा ठेका मोफत देण्याची मागणी
Next articleResearch | नाइट शिफ्ट में काम करनेवालों को कैंसर का ज्यादा खतरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).