Home Woman International Women’s Day | आज शंखध्वनीने होणार महिला दिवसाचे स्वागत

International Women’s Day | आज शंखध्वनीने होणार महिला दिवसाचे स्वागत

हंसाबेन पाघडाल यांचा पुढाकार

नागपूर ब्युरो : शंखध्वनीने महिला दिवसाच्या स्वागताचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, 8 मार्च राेजी सकाळी 8 वाजता नागपुरातील अंबाझरी ओव्हर फ्लाे येथील स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात महिलांचा समुह शंखनाद करुन महिला दिवसाचे स्वागत करणार आहे.

नागपुरातील प्रथितयश सामाजिक महिला कार्यकर्ता हंसाबेन पाघडाल यांनी महिलांव्दारे शंखनाद या उपक्रमा करिता पुढाकार घेतला. श्रीमती पाघडाल स्वत: उत्तम शंख वादक आहेत. महिलांनीही शंख वादन केले पाहिजे, याकरिता गत 6 महिन्यांपासून त्या काही निवडक महिलांवर काम करित आहेत. आता सुमारे 15 महिलांचा चमु शंख वादनात तयार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here