Home Health निकृष्ट दर्जाचे इनक्यूबेटर पुरवठा करणाºयांवर गुन्हे दाखल करणार काय?

निकृष्ट दर्जाचे इनक्यूबेटर पुरवठा करणाºयांवर गुन्हे दाखल करणार काय?

आ. परिणय फुके यांचा सवाल

मुंबर्ई ब्युरो : भंडारा अग्नीकांड ज्या इनक्यूबेटर ब्लास्टमुळे झाला, त्या निष्कृष्ट दर्जाच्या इनक्यूबेटरचा पुरवठा करणाºयावर आपण गुन्हे दाखल करणार काय? असा सवाल गोंदिया, भंडारा जिल्हयाचे आ. डॉ. परिणय फुके यांनी सरकार ला विचारला आहे.

ते म्हणाले, या अग्नीकांडाचा ठपका ज्या दोन कंत्राटी नर्सेसवर ठेवण्यात आला, खरचं त्या नर्सेस जबाबदार होत्या का? की केवळ बळीचा बकरा म्हणून काही अधिकारी आणि त्या ठेकेदारांना वाचवण्याकरिता यांनी त्या नर्सेसना फसवण्याचं काम केले आहे?

डॉ. परिणय फुके यांनी म्हटलं आहे कि ज्या संबंधित अधिकाºयांमुळे गेली 3 वर्ष ही फाइल मंत्रालयाच्या टेबलावर धूळ खात होती त्या संबधित अधिकाºयांवर मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल करणार का आणि संबधित सिविल सर्जनपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाºया डॉक्टरांपर्यंत त्यांच्यावर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहात का?

विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेल्या या प्रश्नांची दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Previous articleMaratha reservation | सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची विनंती मान्य
Next articleराज्याचा अर्थसंकल्प ठाकरे सरकारकडून जनतेची फसवणूक – बावनकुळे यांची टीका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).