Home Maharashtra आ. परिणय फुके यांचा सवाल । रेती तसकऱ्यांची पोलीस चौकी जाळण्याची हिम्मत...

आ. परिणय फुके यांचा सवाल । रेती तसकऱ्यांची पोलीस चौकी जाळण्याची हिम्मत होतेच कशी?

मुंबई ब्युरो : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे भाजपा चे आ. परिणय फुके सतत स्थानिक मुद्द्यांवर सरकार ला धारेवर धरत आहेत. विधान परिषदेत त्यांची आक्रमक भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

आ. परिणय फुके म्हणाले शुक्रवारी सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान भंडारा जिल्ह्यांतर्गत खमारी, बेलगाव फाटा येथे स्थित पोलीस चौकीला रेती तसकऱ्यांनी जाळून खाक केले. ही घटना कारदा पोलिस स्टेशनपासून 4 किलो मीटर अंतरावर व जिल्हा पोलीस मुख्यालयापासून 5-6 किमीच्या अंतरावर घडली. रेती तसकऱ्यांची हिंमत इतकी वाढली आहे कि त्यांनी पोलीस चौकी जाळून टाकली. ही बाब अत्यंत गंभीर असून यांना कोणाचा पाठींबा आहे, याची चौकशी व्हायला व्हावी. तसेच सर्व संबधित दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.