Home Maharashtra Nagpur । नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम

Nagpur । नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम

नागपूर ब्युरो : नागपुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरासाठी 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत लावलेले सर्व निर्बंध पुढील आदेशपर्यंत 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉलमधील विवाह बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील. शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता आठवड्याच्या शेवटी बाजार बंद राहतील.

नागपूर जिल्ह्यासंदर्भात प्रशासनाने घेतलेले निर्णय
 1. आठवडी बाजार 14 मार्चपर्यंत बंद
 2. मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद
 3. 14 मार्चपर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील
 4. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील
 5. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 14 मार्च पर्यंत बंद राहतील
 6. मंगल कार्यालय 14 मार्चपर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल.
 7. मंगल कार्यालयमध्ये 14 मार्चपर्यंत लग्न होणार नाही.
 8. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार
 9. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार
 10. नागपुरात तूर्तास लॉकडाऊन नाही
 11. 14 मार्चपर्यंत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्बंध
काय सुरु राहणार?
 1. वैद्यकीय सेवा
 2. वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा
 3. दूध विक्री आणि पुरवठा
 4. फळे विक्री आणि पुरवठा
 5. गॅरेज, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा
 6. बांधकामे, उद्योग आणि कारखाने
 7. किराणा दुकाने, चिकन, मटन, अंडी आणि मांस विक्री दुकाने
 8. पशु खाद्य दुकाने
 9. बँक आणि पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरु ठेवण्यास मुभा राहील
नागपुरातील कोरोनाची सद्यस्थिती

शुक्रवार 5 मार्च रोजी नागपुरात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. काल नागपुरात 1393 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये नागपूर शहरात 1172 तर नागपूरच्या ग्रामीण भागातील 221 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी 583 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झाला.

Previous articleअब पेंच के जंगल में बेखौफ घूमेंगी अवनी की “बेटी” पीटीआरएफ-84
Next articleआ. परिणय फुके यांचा सवाल । रेती तसकऱ्यांची पोलीस चौकी जाळण्याची हिम्मत होतेच कशी?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).