राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान पूर्व विदर्भातीय भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतकºयांना झाले. मात्र शासणाची जेव्हा मदत जाहिर झाली तेव्हा याच जिल्ह्यातील शेतकºयांना तुटपुंजी मदत देण्यात आल्याचा आरोप करत भाजप चे आ. परिणय फुके यांनी शासणाला धारेवर धरले.
आ. परिणय फुके म्हणाले की नागपूर विभागामध्ये 9 नोव्हेंबर 2020 रोजी जाहिर करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे प्रति जिल्हा केवळ 1.97 कोटी एवढी मदत आज पर्यंत मिळाली आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागामध्ये प्रति जिल्हा 9.66 कोटी, तर खान्देशमध्ये 44.68 कोटी इतकी मदत देण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा ही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित शेतकºयांची संख्या जास्त असताना ही शासनाने त्यांना तुटपुंजी मदत का दिली? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. संपूर्ण भरपाई शासन केव्हा देणार? का नेहमीच विदर्भावर असा अन्याय होत राहणार? याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असेही आ. फुके यावेळी म्हणाले.