गोंदिया ब्यूरो : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच तुम्ही त्रास का देता? सरकारने शेतकऱ्यांची वीज कापू नका, असे आदेश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना वारंवार वसुलीच्या नोटीस देऊन वीज कनेक्शन कापण्याच्या धमक्या का देता? असा संतप्त सवाल भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आमदार डॉ. परिणय फुके यांनी महावितरण चे गोंदिया येथील मुख्य अभियंता यांना केला.
या दोन्ही जिल्ह्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी आ. डॉ. फुके यांच्याकडे महावितरण कडून होत असलेल्या जबरदस्तीच्या वसुली बद्दल तक्रार केली. यानंतर डॉ. फुके यांनी लगेच फोन करून शेतकऱ्यांकडून ही जबरदस्तीची वसुली करणे थांबवा अशा शब्दात मुख्य अभियंत्यांना धारेवर धरले.