Home National राहणीमान सुलभता निर्देशांकात नागपूराने घेतली भरारी, देशभरात 25 व्या क्रमांकावर

राहणीमान सुलभता निर्देशांकात नागपूराने घेतली भरारी, देशभरात 25 व्या क्रमांकावर

महापौर – आयुक्त -स्मार्ट सिटीच्या मुख्याधिकारी यांनी केले अभिनंदन

नागपूर ब्युरो : केन्द्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील मोठे 111 शहरांमधील राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 (ईज ऑफ लीविंग इंडेक्स) आणि महानगरपालिका कामगिरी निर्देशांकाचे निकालाची घोषणा गुरुवारी (4 मार्च) ला करण्यात आली. केन्द्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमाने याची घोषणा केली.

या निर्देशांकामध्ये नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन यांनी मोठी भरारी मारली आहे. राहणीमान सुलभता निर्देशांक मध्ये नागपूर देशभरात 25 व्या क्रमांकचे शहर ठरले आहे. मागच्या वर्षी 2019 मध्ये नागपूरचा क्रमांक 31 होता. तसेच महानगरपालिका कामगिरी निर्देशांक पहिल्यांदाच घेण्यात आला आणि त्यामध्ये नागपूर 30 व्या क्रमांकावर आहे. नागपूरच्या नागरिकांकडून महानगरपालिकेव्दारे दिल्या जाणा-या सोयी सुविधांच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादामुळे शहर 17 व्या क्रमांकावर आले आहे. तसेच तंत्रज्ञानचा उपयोगात नागपूर 9 व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर 8 व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.

आणखी मेहनत करण्याची गरज- महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर चे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यासाठी केन्द्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे आणि स्मार्ट सिटी टीमचे हार्दिक अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की याच्यातून प्रेरणा घेऊन आणखी मेहनत करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, नागपूर हा देशाच्या ह्रदयस्थळी असलेले शहर आहे. केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शहरासाठी भरीव योगदान केले आहे. मागच्या 15 वर्षापासून मनपाच्या माध्यमाने नागपूरकरांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिले जात आहे. नागपूर पुढच्या वर्षी सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी मी आशा बाळगतो.

मोठी उपलब्धी- मनपा आयुक्त राधाकृष्णन. बी

मनपा आयुक्त राधाकृष्णन. बी म्हणाले की, महानगरपालिकेच्या कामाचे नागरिकांव्दारे मूल्यमापन करणे आणि त्यामध्ये 17 वा क्रमांक येणे, ही मोठी उपलब्धी आहे. नागपूर महाराष्ट्राचे मोठे शहर आहे आणि सर्व प्रकारची सोई सुविधा नागरिकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो.

रँकिंग सुधारण्यास प्रयत्न-भुवनेश्वरी. एस

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी सांगितले की, नागपूरनी आपल्या रँकिंग मध्ये सुधार केला आहे. वर्ष 2019 मध्ये आम्ही राहणीमान निर्देशांकात 31 व्या क्रमांकावर होता आता आम्ही 25 व्या क्रमांकावर आहोत. तसेच पहिल्यांदा सुरु केलेले महानगरपालिका कामगिरी निर्देशांक मध्ये 30 व्या क्रमांकवर आहेत. नागपूरच्या नागरिकांना मनपा व स्मार्ट सिटीच्या माध्यमाने दिले जाणारे सेवेत 17 वा क्रमांक दिला आहे. यासाठी मी नागरिकांचे आभार व्यक्त करते. पुढच्या वर्षी आम्ही आपली रँकिंग सुधारण्यास प्रयत्न करु.

ऑनलाईन कार्यक्रमात स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती भुवनेश्वरी एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकुर, मुख्य वित्त अधिकारी श्रीमती नेहा झा, पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर उपस्थित होते. सेन्टर फार सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या श्रीमती लीना बुधे, ग्रीन ‍ व्हिजल फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनीसुध्दा ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेतला.

या राहणीमान निर्देशांक मध्ये जीवनमान गुणवत्ता, आर्थिक क्षमता, सेवा मधील सातत्य निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. नागरिकांना मिळणा-या सेवेत नागरिकांचे मत नोंदविणे महत्वाचे भाग होते. तसेच महानगरपालिकाचे कारभार, सेवा, योजना, तंत्रज्ञान आणि वित्तीय व्यवस्थापनचे मूल्यमापन नगरपालिका कामगिरी निर्देशांक मध्ये करण्यात आले.

Previous article‘आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या गाण्यावर फारुक अब्दुल्ला यांनी केला डान्स
Next articleNagpur । राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काढली सायकल रॅली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).