Home मराठी भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का? : नाना पटोले

भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का? : नाना पटोले

मुंबई ब्युरो : अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे. काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत ? रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, राम मंदिरासाठी पैसे मागितले आणि देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली अशी तक्रार आपल्याकडेही आली आहे. भगवान श्रीरामाच्या नावावर महाराष्ट्रात पैसे मागितले जात आहेत. त्यांना असे पैसे गोळा करण्याचा काय अधिकार आहे? राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या चॅरिटी ट्रस्टकडून घेतला जात आहे तसेच राम मंदिरासाठी 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा, असेही पटोले म्हणाले.

Previous articleराहत की खबर | ईपीएफओ ने नहीं घटाई पीएफ की ब्याज दरें, मिलता रहेगा 8.5% ब्याज
Next article‘आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या गाण्यावर फारुक अब्दुल्ला यांनी केला डान्स
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).