Home Maharashtra Nagpur Metro । मेट्रो `फीडर कॅब सर्व्हिस ऑन-कॉल’ सेवेचे लोकार्पण

Nagpur Metro । मेट्रो `फीडर कॅब सर्व्हिस ऑन-कॉल’ सेवेचे लोकार्पण

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले उद्घाटन

नागपूर ब्युरो : जागतिक दर्जाची परिवहन सेवा नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी महा मेट्रो तर्फे सातत्याने प्रयत्न होत आहेत. मेट्रो रेल सेवेच्या आणि फिडर सेवेच्या मदतीने महानगरातील प्रत्येक टाउनशिप जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मेट्रो तर्फे केले जात आहेत. या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकत “मेट्रो फीडर कॅब सर्व्हिस ऑन कॉल” ची बुधवारपासून सुरूवात झाली आहे. या अंतर्गत महा मेट्रोचे खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान मधील विविध कारखाने, उद्योग संबंधी कार्यालयात किंवा एम्स रुग्णालयात जाण्याची सोय झाली आहे.

बुधवारी, 3 मार्च ला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो भवन परिसरात या सेवेची हिरवा झेंडा दाखवत रीतसर शुभारंभ केला. यापूर्वी मेट्रो तर्फे विमानतळावरून विमानतळ मेट्रो स्टेशन पर्यंत फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्थानक परिसरात असलेल्या अनेक लोक वस्त्यांना जोडण्यासाठी फीडर बस सेवा चालवली जात आहे. या सेवेचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागरिक आणि कर्मचाऱ्यांची गरज आणि त्या संबंधी होत असलेली मागणी लक्षात घेता कॉलवर मेट्रो फीडर टॅक्सीची सेवा सुरु करण्यात आली आहे. खापरी मेट्रो स्थानकातून मिहान आणि आसपासच्या अनेक कंपन्यांना “मेट्रो फीडर कॅब सर्व्हिसेस” चा लाभ मिळणार आहे. ही सेवा मिहान आणि त्या परिसरातील कर्मचारी, अभ्यागत आणि रहिवाश्यांना फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

या व्यवस्थे अंतर्गत पास आणि मासिक सदस्यत्व असे पर्याय उपलब्ध आहेत जेणेकरुन कर्मचारी त्यांच्यातील त्यांना उपयुक्त पर्यायाची निवड करू शकतील आणि या सेवांचा लाभ घेऊ शकतील. विशेषतः कर्मचारी आपल्या कार्यालयात आणि मिहानमधील मेट्रो स्टेशनवर परत जाण्यासाठी कॉल करू शकतात. ‘ऑन-कॉल’ तत्त्वावर कर्मचारी आणि रहिवाशांसाठी मेट्रो फीडर कॅब सेवा अत्यंत सोपी आणि कार्यक्षम आहे.

मेट्रो सेवा दरम्यान आणि सर्व दिवस सेवा उपलब्ध असतील. या सेवेचा लाभ घेण्याकरता 8888860385 आणि 7276224240 – या दोन क्रमांकावर कॉल करू शकतात. मेट्रो फीडर कॅब सर्व्हिस प्रोव्हाईडरची टीम खापरी मेट्रो स्थानकातून उपलब्ध असणार आहे, ही सेवा मिहान, आयटी कॉर्पोरेट्स, एम्स, आयआयएम, कॉनकॉर आणि रहिवाशांसाठी योग्य आहे. उद्घाटन प्रसंगी कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि महा मेट्रोचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous articleSachin at Tadoba | सचिन तेंडुलकरची ताडोबा सफर आणि वाघांचे दर्शन
Next articleMaharashtra । आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले : नाना पटोले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).