Home Social Media Sachin at Tadoba | सचिन तेंडुलकरची ताडोबा सफर आणि वाघांचे दर्शन

Sachin at Tadoba | सचिन तेंडुलकरची ताडोबा सफर आणि वाघांचे दर्शन

चंद्रपूर ब्युरो : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेयर केलेला हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. मात्र सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ क्रिकेटचा नसून चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आहे.

सलग दोन वर्षांपासून सचिन ताडोबाला जात आहे आणि यावर्षी 24 ते 27 जानेवारी दरम्यान चार दिवस तो ताडोबा येथे मुक्कामी होता. या दरम्यान घेतलेल्या अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 4 मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here