Home मराठी Nagpur। शिवाजी महाराजांनी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला -जयदीप कवाडे

Nagpur। शिवाजी महाराजांनी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला -जयदीप कवाडे

पीरिपातर्फे शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

नागपूर ब्युरो : छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी महाराजांनी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित करून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होय. शिवाजीराजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. महाराज जगातील अनेक उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगभर एक प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केली. म्हणजेच शिवाजी महाराजांचे राज्य लोकाभिमुख होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजाला छत्रपतींच्या स्वराज्यात सुखी ठेवले. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य असल्याचेही ते म्हणाले.

या प्रसंगी प्रामुख्याने विजय पाटिल नागपुर प्रदेश अध्यक्ष,राष्ट्रीय मजदुर सेना,पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र संघटक कपिल लिंगायत,अजय चव्हाण,विपीन गाडगीलवार,रोशन तेलरांध्ये,सिद्धार्थ सोमकुवर, ॲड. अरुण महाकाले, भीमराव कलमकर, मुकेश खोब्रगड़े, ऍड.राणा महाकाले, उत्तम हुमणे, दिलीप नितनवरे, कुशिनारा सोमकुवर,स्वप्नील महल्ले, महेन्द्र पावाडे, राहुल देशभ्रतार, डॉ. सूचित रामटेके, निकेश वानखेड़े,पियुष हलमारे,निरज पराडकर,अक्षय नानवटकर, दिलीप पाटील,भूषण डोंगरे, भीमराव मेश्राम, रोशन चव्हाण, प्रकाश अचकार पोहरे, सुमीत सावकर, कृषीनारा शांमकुंवर, विजय बन्सोड, मंगेश कांबळे, मारूती धोटे,विशाल घुगरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here