Home कोरोना Nagpur । लॉकडाउन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद, सर्व शाळा,...

Nagpur । लॉकडाउन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद, सर्व शाळा, कोचिंग सेंटर्स बंद

1812

नागपूर ब्यूरो: नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केलं जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  1. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.
  2. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.
  3. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, औषध पेट्रोल पंप वगळून) बंद ठेवणार.
  4. आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.
  5. जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.
  6. लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद.
  7. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील.
  8. कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.
  9. कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आएलटी तसेच सारीची तपासणी करणार.
  10. शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रोकन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना.
    हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.
  11. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.
  12. नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
  13. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .
  14. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.
    त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.
  15. कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.