Home Bollywood चर्चांना उधाण | मिथून चक्रवर्ती यांच्या घरी पोहोचले मोहन भागवत

चर्चांना उधाण | मिथून चक्रवर्ती यांच्या घरी पोहोचले मोहन भागवत

564

नवी दिल्ली ब्युरो : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मंगळवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. भागवत आणि मिथून यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. याआधी ऑक्टोबर 2019 मध्येहीह भागवत यांनी मिथून यांची भेट घेतली होती.

याशिवाय मिथून ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातही गेले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्प आर्पित करून मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मिथून चक्रवर्तींना तृणमूल काँगेसनं पश्चिम बंगालमधून राज्यसभेतही पाठवलं होतं. मात्र, सदनात सतत अनुपस्थित राहात असल्यानं मिथून यांनी स्वतःचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतरच मिथून यांची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

Previous articleआत्मनिर्भर । दो बहनों ने 300 रुपए में शुरू किया सैंडल का ऑनलाइन बिजनेस
Next article18 फेब्रुवारी पासून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत शटल बस सेवा नागरिकांच्या सेवेत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).